Marathi

ना.ग.आचार्य व दा.कृ.मराठे महाविद्यालयाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाची स्थापना जुलै १९८२ मध्ये झाली. या कालावधीपासून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती या क्षेत्रात या विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या क्रमिक अभ्यासक्रमाचे नियमित व चांगल्या दर्जाच्या निकालासह असलेले अध्यापन, सातत्यपूर्ण चर्चा सत्रे, व्याख्यानमाला, मराठी वाङ्मय मंडळाचे वेगवेगळ्या प्रकारचे सातत्यपूर्ण अनेक कार्यक्रम, विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण सुसंवाद तसेच त्यांचा कृतीशील सहभागही याविभागाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्यांचा विकास, वाङ्मयीन व सौंदर्यात्मक अभिरूचीची अभिवृद्घी, मराठी साहित्य परंपरेच्या परिचयातून त्यांच्या सामाजिक भानाची जडण घडण तसेच विविध विचारप्रवाहांच्या परिचयातून घडणारे चिकित्सक मूल्यभान ही या विभागाची मुख्य उद्दिष्टेआहेत.

विभाग प्रोफाइल (डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा)

Scroll to Top